Government Jobs Dated 12th oct2009
दिल्ली विश्वविद्यालयात अपंगांसाठी ९ जागा
दिल्ली विश्वविद्यालयात अपंग भरती अंतर्गत सहायक ग्रंथपाल/डॉक्युमेंटेशन ऑफिसर (१ जागा), सहायक कुलसचिव/प्रशासकीय अधिकारी/सहायक परीक्षा नियंत्रक (१ जागा), सहायक संचालक (१ जागा), हिंदी अधिकारी (१ जागा), स्टेनोग्राफर (१ जागा), ग्रंथालय अटेंडंट (१ जागा), प्रयोगशाळा अटेंडंट (३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख २७ ऑक्टोबर २००९ आहे. अधिक माहिती www.du.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. इंडियन एक्स्प्रेसच्या मुंबई आवृत्तीमध्ये ८ ऑक्टोबर २००९ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
भारतीय जीवन विमा महामंडळात १८८ जागा
भारतीय जीवन विमा महामंडळ, (एलआयसी) नवी दिल्ली येथे डायरेक्ट सेल्स एक्झिक्युटिव्ह (१८८ जागा) हे पद कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येणार आहे. अर्ज २३ ऑक्टोबर २००९ पर्यंत पाठवावेत. यासंबंधीची अधिक माहिती http://www.licindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
हरियाणा ग्रामीण बँकेत अधिकारी/लिपिकाच्या १६७ जागा
हरियाणा ग्रामीण बँकेत स्केल १ ऑफिसर (६० जागा), लिपिक-नि-रोखपाल (१०१ जागा), लिपिक-नि-टंकलेखक (६ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज १० नोव्हेंबर २००९ पर्यंत पाठवावेत. अधिक माहिती http://www.hgb.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.





0 comments:
Post a Comment