Govt Jobs 10/10/2009
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात कुलसचिवाची १ जागा
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे कुलसचिव (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ५ नोव्हेंबर २००९ आहे. अधिक माहिती www.nagpuruniversity.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. इंडियन एक्स्प्रेसच्या मुंबई आवृत्तीमध्ये ८ ऑक्टोबर २००९ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
पाँडेचरी केंद्रीय विद्यापीठात पदवीधरांसाठी ५ जागा
पाँडेचरी केंद्रीय विद्यापीठात पदवीधर प्रशिक्षणार्थी -ग्रंथालय (५ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज ९ नोव्हेंबर २००९ पर्यंत पाठवावेत. अधिक माहिती http://www.pondiuni.edu.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
स्टिल अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये २०० जागा
स्टिल अथॉरिटी ऑफ इंडिया (सेल)च्या पश्चिम बंगामधील प्लँटमध्ये ऑपरेटर कम टेक्निशियन (१०० जागा), अटेंडंट कम टेक्निशियन (१०० जागा) ही पदे भरण्यात येणार आहे. अर्ज १८ ऑक्टोबर २००९ पूर्वी पाठवावेत. अधिक माहिती http://sail.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
मुंबई विद्यापीठाच्या मुद्रणालयात २ जागा
मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवरील मुद्रणालयात नियंत्रक-मुद्रणालय (१ जागा), अधिक्षक - तांत्रिक (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडिया व महाराष्ट्र टाइम्सच्या मुंबई आवृत्तीमध्ये ८ ऑक्टोबर २००९ रोजी प्रसिद्ध झाली आहे.





0 comments:
Post a Comment